तुम्ही मला साथ द्या, बारामती कुठल्या कुठे नेतो; अजित पवारांचे बारामतीकरांना आश्वासन

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्पष्ट बोलण्यासाठी ओळखले जातात. बारामतीमध्ये बिल्डर असोसिएशनच्या कार्यक्रमांमध्ये बोलताना अजित पवार यांनी बारामतीकरांना मोठे आश्वासन दिले आहे. बारामती करून तुम्ही फक्त मला साथ द्या, मी बारामती कुठल्या कुठे नेतो. जेव्हा कुठे मी कोणाला उभ केलं तर तुम्ही त्याची बटणे दाबा. मला जे योग्य वाटेल त्यांना मी तिकीट देईल तुम्ही फक्त त्यांना साथ द्या.कारण ही सगळी काम करण्याकरता टीमवर्क असावा लागत असं अजित पवार म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, माळेगावच्या कारखान्याच्या परिसरामध्ये अनेक गोष्टी करणं बाकी राहिल आहे. कारण सत्तर वर्षांपूर्वीचा हा कारखाना आहे. त्या ठिकाणी अजून बदल करायचा आहे. तिथल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सर्व सुख सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत. परिसर नीटनेटका नियोजनबद्ध पद्धतीचा व्हावा म्हणून आपण सगळे मिळून काम करू असे अजित पवार यांनी बोलताना म्हटले.
दरम्यान याआधी अजित पवार यांनी नियम मोडणाऱ्या बारामतीकरांना इशारा देखील दिला आहे. कुणीही अजिबात नियम मोडू नका, तो अजित पवार असो किंवा अजित पवारांचा कोणी नातेवाईक सर्वांना नियम सारखा आहे. मी जे करतो ते सर्व बारामतीकरांसाठी करतो असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.
