बँकेची कामे असतील तर उरकून घ्या! ‘या’ आठवड्यात ४ दिवस बँका राहणार बंद , जाणून घ्या…

मुंबई : दैनंदिन जीवनात बँकेतील व्यवहार करताना अनेकदा बँका बंद असल्यावर अनेकदा अडचणी येतात. आता या आठवड्यात बँकांमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर आधी सुट्ट्यांची माहिती तपासणे गरजेचे आहे. सण, जयंती आणि नियमित साप्ताहिक विश्रांतीमुळे काही दिवशी शाखा बंद राहणार आहेत. यामुळे कामे उरकून घ्यावी लागणार आहेत.

आर्थिक व्यवहार, चेक क्लिअरन्स किंवा इतर कामे प्रलंबित राहू नयेत यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. १९ फेब्रुवारी (गुरुवार) रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी राज्यातील सर्व बँक शाखा बंद राहतील. यामुळे या दिवशी तुम्हाला बँकेत जाता येणार नाही.
तसेच २० फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्यांमध्ये स्थानिक कारणांमुळे बँकांचे कामकाज होणार नाही. त्यामुळे त्या राज्यांतील ग्राहकांनी व्यवहारांची पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात यामुळे अडचणी येणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे.

दरम्यान, संबंधित राज्यांव्यतिरिक्त इतर ठिकाणी मात्र सेवा सुरू राहतील. तसेच २२ फेब्रुवारी (रविवार) हा साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्यामुळे देशभरातील सर्व बँका बंद असतील. जरी ऑनलाइन बँकिंग, मोबाईल अॅप आणि एटीएम सेवा सुरू असल्या तरी शाखांमधील प्रत्यक्ष कामकाज होणार नाही.