लग्नासाठी मेकअप आर्टिस्टला बोलावणार असाल तर सावधान! दोन तरुणींनी नवरीच्या दागिन्यांवर मारला डल्ला…


मुंबई : डोंबिवलीत साखरपुड्याचा मेकअप करण्यासाठी आलेल्या मेकअप आर्टिस्टने नवरीच्या दागिन्यांवर हात साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे. डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल जवळ सायंकाळी १५ ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी सोनारपाडा परिसरातून अंकिता आणि कल्पना या दोन तरुणींना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून ६८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय.

मिळालेल्या माहिती नुसार, मुलुंडमधील पूजा गुप्ता या २३ वर्षीय तरुणीचा साखरपुडा करण्यासाठी २ मेकअप आर्टिस्ट आल्या होत्या. अंकिता आणि कल्पना या दोघींना पूजाने मेकअपची ऑर्डर दिली होती. समारंभ सुरू होण्याच्या एक सात आधी या दोघी हॉलवर दाखल झाल्या होत्या. त्यांनी पूजाचा सुंदर मेकअप केला.

मेकअप झाल्यावर नवरी स्टेजवर आली. साखरपुड्यासाठी हॉलमध्ये पाहुण्यांनी मोठी गर्दी केली होती. या आनंदाच्या क्षणी नवरी आणि नवरदेव दोघेही खुश होते. इकडे सर्व आनंदात असताना नवरीच्या दागिन्यांची बॅग मेकअप रुममध्येच होती.

या बॅगेवर अंकिता आणि कल्पना या दोघींची नजर पडली. दागिने आणि रोकड पाहून ते चोरण्याचा त्यांना मोह आवरला नाही. एकीकडे कार्यक्रम सुरू असताना दोघींनी दागिने आणि रोकडवर डल्ला मारला.

काही वेळातच त्या तेथून निघून गेल्या. नवरीचे दागिने घेण्यासाठी जेव्हा एक मुलगी रुममध्ये आली तेव्हा पर्स रिकामी होती. दागिने आणि रोकड चोरी झाल्याचे लक्षात येताच नवरीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

दरम्यानदागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान पोलिसांनी हॉलमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यामध्ये अंकिता आणि कल्पना यांची चोरी पकडली गेली. सोनारपाडा परिसरातून या दोघींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच पोलिसांनी त्यांच्याकडून ६८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!