पुरंदर विमानतळ परिसरात मोठी इमारत बांधत असाल तर थांबा? मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय….

पुणे : विमानतळाच्या प्रभाव क्षेत्रात कोठेही घरे, व उंच इमारती होणार नाहीत. जागेची खरेदी-विक्री होणार नाही, याची काळजी सरकार म्हणून आम्ही घेऊ, अशी भूमिका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली आहे.
तसेच पुरंदर विमानतळाच्या ९० टक्के जागेचे भूसंपादन झाले आहे. उर्वरित भूसंपादन लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. विमानतळाच्या शेजारी अनेक जागांची विक्री होत असून भविष्यात या ठिकाणी उंच इमारती उभारल्या जातील अशी शक्यता पत्रकारांनी व्यक्त केल्यानंतर बावनकुळे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले, प्रकल्प थांबले तरी चालतील पण दिवाळीत शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये. यासाठी महायुती सरकारने अतिवृष्टीग्रस्तांसाठी साडेएकतीस हजार कोटींचे मदतीचे पॅकेज जाहीर केले.
हा पीक विमा नाही. त्यामुळे विरोधक जे आरोप करत आहेत ते चुकीचे आहेत. उद्धव ठाकरेंना अडीच वर्षात मुख्यमंत्रीपद समजलेच नाही. ते विधानसभेत केवळ दोन वेळा, मंत्रालयात दोन वेळा आले. उद्धव ठाकरे हे आत्तापर्यंतचे सर्वात हतबल मुख्यमंत्री ठरले आहेत.