जीआरमध्ये फसवणूक झाल्यास महाराष्ट्रात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही ; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा..

मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचं सांगितलं आहे. त्यानुसार गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं उपसमितीने मनोज जरांगे यांच्यासमोर मान्य केलं. त्यानंतर मागण्यांचा जीआर काढणार असल्याचं सरकारने मान्य केलं..मात्र या जीआर मध्ये काही फसवणूक झाली तर महाराष्ट्रात एकाही मंत्र्याला फिरवून देणार नसल्याचा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असलेल्या अभ्यासकांना देखील सरकारनं काढलेला मसुदा मान्य झाला आहे. मसुदा एकदम योग्य असल्याचं अभ्यासकांचं देखील मत आहे. सरकारवर विश्वास ठेवा. जर जीआरमध्ये फसवणूक झाली तर महाराष्ट्रात एकपण मंत्री फिरु देणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले.यामध्ये हैद्राबाद गॅजेट लागू करण्याच्या मागणीस उपसमितीने मान्यता दिली आहे, याचा अर्थ हैद्राबाद गॅजेटची अंमलबजावणी करण्याची सूचना उपसमितीकडून देण्यात येईल.
तसेच सातारा गॅजेटबद्दल आपण मागणी केली होती, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठा यामध्ये येतो. औंध आणि सातारा मध्ये काही त्रुटी आहेत. पुढील 15 दिवसात कायदेशीर त्रुटीचा अभ्यास करून अंमलबाजवणी केली जाईल, असे शासनाने म्हटले आहे.हैदराबाद आणि सातारा या 2 गॅजेटच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. बाकी 5 मागण्यांचा शासन निर्णय काढू म्हणत आहेत, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी शासनाने आपल्या मागण्या मान्य केल्याची घोषणा केली आहे.
