जर पक्षाने आम्हाला कोललं तर आम्ही पण पक्षाला कोलणार!! इंदापुरातील बड्या नेत्याचा अजित पवारांना इशारा…


इंदापूर : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. अशातच नगरपंचायत, नगरपरिषदा याच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. सध्या उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वच पक्षाचे नेते प्रयत्न करत आहेत.

इंदापूरमधून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दत्तात्रेय भरणे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर पक्षावर नाराज असून इंदापूर नगराध्यक्ष पदाबाबत योग्य निर्णय पक्षाने घेतला नाही तर आपण वेगळा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

जर पक्षाने आम्हाला कोललं तर आम्ही पण पक्षाला कोलणार, असे म्हणत त्यांनी अजित पवारांना इशारा दिला आहे. यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. प्रदीप गारटकर यांची इंदापूर मध्ये वैयक्तिक ताकद असून दत्तात्रेय भरणे यांना निवडून आणण्यात त्यांची मोठी भूमिका होती.

असे असताना मात्र सध्या नगराध्यक्ष पदाबाबत पक्षाकडून वेगळी संकेत मिळत असल्याने गारटकर नाराज झाले आहेत. यामुळे हर्षवर्धन पाटील गटाच्या पाठिंब्यावर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. यामुळे आगामी काळात इंदापूर मधील राजकीय वातावरण बदलणार आहे.

हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर मध्ये ताकद असून प्रदीप गारटकर यांना ते पाठिंबा देऊ शकतात. यामुळे येणाऱ्या काळात अजित पवार गट गारटकर यांच्याबाबत काय भूमिका घेणार हे लवकरच समजेल. सध्या गारटकर हे आपल्या कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!