सलमान, शाहरुख किंवा अक्षय नाही तर, ‘हा’ आहे सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता
मुंबई : सध्या चित्रपटसृष्टीवर सलमान, शाहरुख आणि आमिर या तिघांच वर्चस्व आहे. त्यांचे अनेक चाहते देखील मोठे आहेत. तसेच हे तिघे मोठ्या प्रमाणात मानधन घेतात. अक्षय कुमार देखील भारतातले सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेते होते.
आता यांना मागे टाकत एका दाक्षिणात्य अभिनेत्याचं नाव समोर आलं आहे. दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजय हा भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे.
आधीदेखील विजयने त्याच्या चित्रपटासाठी १०० कोटी मानधन घेत रेकॉर्ड केला होताच, आता ‘थलपती ६८’ या आगामी चित्रपटासाठी विजयने २०० कोटी रुपये मानधन आकारल्याचे समोर आले आहे.
आजपर्यंत कोणत्याही भारतीय सुपरस्टारने एवढं मानधन घेतलेलं नाही. यामुळेच त्याची सर्वात जास्त चर्चा होत आहे. चित्रपटासाठी २०० कोटी मानधन घेणारा विजय हा पहिला अभिनेता ठरला आहे.
तसेच विजय राजकारणातही प्रवेश घेणार आहे आणि ‘थलपती ६८’ हा त्याचा शेवटचा चित्रपट असू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे तो नेहेमी चर्चा सुरू झाली आहे.