स्मारकासाठी ताजमहलपेक्षा जास्त लोक नाही आले तर माझं नाव बदलून ठेवा!! मुख्यमंत्री फडणवीसांची सर्वांत मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?


आग्रा : राज्यासह देशात काल छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच आग्र्यातही शिवजयंती साजरी करण्यात आली. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी एक मोठी घोषणा केली. त्यांनी आग्र्यात शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधण्याची घोषणा केली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हे स्मारक अत्यंत भव्यदिव्य असेल. ताजमहलपेक्षाही अधिक लोक शिवाजी महाराजांचं स्मारक पाहायला येतील, एवढं भव्य स्मारक आग्र्यात बांधण्यात येईल. मी योगींना प्रार्थना करतो. आम्हाला परवानगी द्या. महाराष्ट्र सरकार जमीन संपादित करेल.

फडणवीस म्हणाले, माँ कसम मी सांगतो, एकदा हे स्मारक बनलं तर ताजमहलपेक्षा अधिक लोक हे स्मारक पाहायला आले नाही तर माझं नाव बदलून ठेवा. माझं नाव देवेंद्र फडणवीस सांगणार नाही. याबाबत मी योगींशी बोलणार आहे. त्यांना निवेदन देणार आहे. तुम्हाला विनंती करतो तुम्हीही माझी बाजू मांडा. आपल्याला भव्य स्मारक बनवायचे आहे, असेही फडणवीस म्हणाले.

यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, शिवाजी महाराज केवळ राजा नव्हते, तर ते एक युगपुरुष होते. आग्य्रातील कोठी आज मीना बाजार या नावाने ओळखली जाते, याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना बंदी ठेवण्यात आले होते, तेथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.

तसेच फडणवीस म्हणाले, औरंगाबादला आम्ही छत्रपती संभाजीनगर बनवले, आमचा हिरो छत्रपती संभाजी महाराज आहेत. औरंगजेब हा जिंकण्यासाठी आला, मात्र त्याची कबर ही महाराष्ट्रात झाली, औरंगजेब जिवंत परत गेला नाही. औरंजेब आमचा पूर्वज नाही. असेही फडणवीस यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!