राजकारणात मोठी खळबळ! भाजप ‘काँग्रेस’सारखा झाला तर संघ १० नवे पक्ष उभे करेल; शरद पोंक्षेंचा इशारा..


पुणे : ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची जननी आहे; भाजपची अवस्था काँग्रेससारखी झाली, तर १० भाजप उभ्या करण्याची ताकद संघात आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते व व्याख्याते शरद पोंक्षे यांनी भाजपवर वर टीका केली आहे.

नागपुर येथे आयोजित व्याख्यानमालेत बोलताना ज्येष्ठ अभिनेते व व्याख्याते शरद पोंक्षे यांनी खळबळजनक विधान केले. ‘भारत एक हिंदू राष्ट्र’ या विषयावर भाष्य करताना त्यांनी भाजप र अप्रत्यक्ष टीका केली.

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे नागपुरातील रेशीमबाग येथे ‘रामस्मरण’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. संघाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या ठिकाणीच पोंक्षे यांनी सत्ताधारी पक्षाला ‘अहंकार’ न बाळगण्याचा सूचक इशारा दिला.

गेल्या काही काळात पक्षाच्या कार्यपद्धतीत होत असलेले बदल आणि ‘आम्हाला कोणीच हरवू शकत नाही’ ही वाढती वृत्ती यावर त्यांनी थेट बोट ठेवत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. शरद पोंक्षे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, आज भारतात हिंदू सण-उत्सव ज्या थाटात साजरे होत आहेत, त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघाला जाते.

मात्र, सत्तेच्या प्रवाहात भाजप आपल्या मूळ विचारधारेपासून दूर गेला किंवा त्याचे ‘काँग्रेसीकरण’ झाले, तर संघ शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. “पुन्हा अनेक वर्ष वाट पाहावी लागली तरी चालेल, पण कट्टर हिंदुत्व जपणारे नवे पर्याय संघ उभे करू शकतो,” असे परखड मत शरद पोंक्षे यांनी मांडले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!