ICC World Cup 2023 : विश्वचषक सामन्यांच्या तिकिटांच्या विक्रीतून २२०० कोटी रुपये मिळणार, क्रिकेटप्रेमींनी केली तिकीट बुक


ICC World Cup 2023 :  सर्वांचे लक्ष लागलेल्या क्रिकेटचा महासंग्राम सुरु होण्यास अवघे काही तास शिल्लक आहे. भारतात होणारा विश्वचषक २०२३ आजपासून सुरुवात होणार आहे. यंदा विश्वचषक स्पर्धा भारतात होत असल्याने भारतीय क्रिडा प्रेमींची उत्सुकला आणि उत्साह शिगेला पोहोचला आहे.

यामुळे प्रत्येक सामन्यावर क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे. असे असताना यामधून मोठ्या प्रमाणावर पैसे देखील मिळणार आहेत. क्रिकेट विश्वचषक सुरू झाल्यामुळे या चॅम्पियनशिपमधून देशात १८,००० कोटी ते २२,००० कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित आहे. ICC World Cup 2023

या कालावधीत, रोजंदारी कामगार आणि व्यवस्थापनाशी संबंधित लोक १००० कोटी रुपयांपर्यंत कमवू शकतात. अन्न वितरण आणि स्क्रीनिंगचा अंदाजे व्यवसाय ५००० कोटी रुपये मिळणार आहेत.

सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष वर्ल्ड कप २०२३ कडे आहे. आयसीसी वन डे विश्वचषक स्पर्धेला आज गतविजेते इंग्लंड व गतउपविजेते न्यूझीलंड यांच्या सलामी लढतीने थाटात प्रारंभ होत आहे.

या लढतीच्या माध्यमातून २०१९ फायनलची पुनरावृत्ती होत असून चार वर्षांपूर्वी मायभूमीत ऐतिहासिक जेतेपद मिळवणारा इंग्लंडचा संघ येथे पुन्हा एकदा निर्धाराने मैदानात उतरणार आहे. या लढतीला दुपारी २ वाजता प्रारंभ होईल.

दरम्यान, सामन्यांच्या तिकिटांच्या विक्रीतून २,२०० कोटी रुपये मिळतील. टीव्ही प्रायोजकत्व म्हणून जास्तीत जास्त रक्कम १०५०० ते १२,२०० कोटी रुपये असू शकते, तर संघांवर २५० कोटी रुपये खर्च केले जाऊ शकतात.

विश्वचषकातून विदेशी पर्यटकांकडून ६०० कोटी रुपयांची कमाई होऊ शकते. यामुळे आता सगळी तयारी झाली आहे. कोणता संघ आता बाजी मारणार हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!