IAS भूषण गगराणी निवृत्त होणार; मुंबईच्या नव्या आयुक्तपदी कोणाची वर्णी?बड्या अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा


मुंबई : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी येत्या 31 मार्च रोजी निवृत्त होणार आहेत. आता मुंबईच्या नव्या आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे. या आयुक्त पदासाठी प्रशासनातील सात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा जोरदार आहे. यातील कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भूषण गगराणी यांच्या निवृत्तीनंतर पालिका आयुक्तपदासाठी 7 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा आहे. मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, गृहनिर्माणचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता, गृह विभागाच्या अतिरिक्त सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांचा समावेश आहे.गगराणी यांच्या जागी नवीन आयुक्त कोण होणार? याबाबत उत्सुकता वाढली आहे.

भूषण गगराणी हे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते 2024 साली मार्च महिन्यात मुंबईचे आयुक्त झाले. गगरानी यांच्याआधी 1989 बॅचचे आयएएस अधिकारी इकबाल चहल हे मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. त्यांच्या निवृत्तीनंतर आता मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कोण असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!