येत्या 10 दिवसांत मी स्वतःला संपवणार!! छोटा पुढारी घनःश्याम दरोडेचा पोलिसांना इशारा, नेमकं घडलं काय?

श्रीगोंदा : गेल्या काही दिवसांपासून छोटा पुढारी म्हणजेच घनःश्याम दरोडे चर्चेत आला आहे. घनःश्याम सोशल मीडियावर सक्रिय असतो. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर स्वतःच्या निधनाच्या व्हायरल होणाऱ्या पोस्ट पाहून संतापलेल्या घनःश्याम दरोडेनं श्रीगोंदा पोलीस ठाणं गाठून अफवा पसरवणाऱ्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर छोटा पुढारी घनःश्याम दरोडेचं निधन झाल्याच्या काही पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर गोंधळ उडाला आहे. अशातच आता स्वतः घनःश्याम दरोडे यांने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
त्याने याबाबत पोलिसांना कठोर पावले उचलण्याची विनंतीही केली आहे. घनःश्याम दरोडेने पोलिसांना येत्या 10 दिवसांत अफवा पसरवण्यांवर कारवाई करा, नाहीतर मी 10 दिवसांत आत्महत्या करेल असा थेट इशारा पोलिसांना दिला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
स्वतःच्याच निधनाच्या व्हायरल होणाऱ्या पोस्ट पाहून संतापलेल्या घनःश्याम दरोडेनं थेट श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे तो चांगलाच संतापला आहे. दोन सोशल मीडिया चॅनेलवरून त्याच्या विरोधात जाणीवपूर्वक बदनामी करणारे व्हिडीओ प्रसारित केल्याचा आरोप छोटा पुढारीने केला आहे.
दरम्यान, जर 10 दिवसांत काही झालं नाही. त्या मुलांचे अकाऊंट बॅन झाल नाही. माझी नुकसान भरपाई दिली नाही. तर येत्या 10 दिवसांत मी आत्महत्या करणार आहे. मी आता कंटाळलेलो आहे. माझ्या घरचेसुद्धा कमेंट वाचतात. त्यामुळे यांचा सोक्षमोक्ष लागला नाही तर मी 10 दिवसांत आत्महत्या करेन, असे त्याने म्हटले आहे.