‘ तु मला खूप आवडते ” तुझ्या नवऱ्याला उचलून घेऊन जातो’ कदमवाकवस्तीत भरदिवसा विवाहितेशी लगट करण्याचा प्रयत्न ! लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल …


लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत एकाने विवाहित महिलेच्या घरात घुसून लगट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना शुक्रवार (२२ ऑगस्ट) रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी २८ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून मुबारक मोहम्मद शेख (वय २५, रा. घोरपडेवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जिल्हा पुणे) याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला या शुक्रवारी दुपारच्या सुमारांस आपल्या घरातील काम करीत असताना घरी एकट्याच असल्याचे पाहुन मुबारक शेख हा त्यांच्या घराजवळ गेला. व त्याने त्याच्या अश्विनी नामक मैत्रिणीला तिला घराच्या बाहेर बोलाऊन घ्या. त्यांच्याकडे काम आहे असे सांगितले.

पिडीत महिला घराच्या बाहेर आल्यानंतर शेख तिला “मी तुला पहील्यांदा पाहीले तेव्हापासुन मला तु खुप आवडत आहे.” असे म्हणून तिच्याशी जवळीक साधून लगट करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने त्यास नकार दिला. यावेळी त्याने “तु फक्त सांग. मी तुझ्यासाठी काय करु ते. तुझ्या नवऱ्याला घरात घुसुन मारतो, व तुला उचलुन घेऊन जातो.” अशी धमकी दिली. व तो आरोपी निघून गेला.
अर्धा तास झाल्यानंतर तो पुन्हा पिडीतेच्या घरात घुसला.व जबरदस्ती करण्याच्या हेतूने तिच्या जवळ जाऊन ऊन बसला व छेडछाड करू लागला. यामुळे तिच्या स्त्री मनास लज्जा निर्माण झाली. याप्रकरणी तिने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे करीत आहेत

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!