तुला मारायची 30 लाख रुपयांची सुपारी भेटलीय, पुण्यात रील स्टारने हातात बंदूक धरली अन्….


पुणे : सध्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांना सोशल मीडियावर रिल्स बनवण्यास सक्त मनाईचे आदेश दिले आहेत. तरी देखील गुन्हेगारांची मस्ती काही थांबताना दिसत नाही. यामुळे वेगळे संदेश समाजात जात आहेत.

सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अटक केलेल्या दोन खंडणीखोरांनी, गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्रीच पोलिस ठाण्याचा फोटो, हातात पिस्तूल दाखवत रिल्स तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला. यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींवर आळा बसला पाहिजे. यामुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे.

त्यांनी एका बांधकाम व्यावसायिकाकडे पिस्तूलाचा धाक दाखवत तुला मारायची ३० लाखांची सुपारी मिळाली आहे, असे म्हणत ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती. आरोपींनी ऑफिसमध्ये घुसून शटर खाली करत त्याला व त्याच्या मित्रांना मारहाण केली, शिवीगाळ केली आणि पिस्तुल दाखवून धमकावले.

त्यानंतर दुसऱ्या आरोपीने फोनवरून पुन्हा धमकी देत ५०,००० रुपये न दिल्यास तुला शोधून काढू, असे म्हणत पोलिसात तक्रार न करण्याचा इशाराही दिला. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस यंत्रणेमधील कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दादा मोरे (२२, वडगाव बुद्रुक) आणि किरण शिंदे (२४) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यामुळे गुन्हेगारांना पोलिसांची भीती उरली आहे का? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या गुन्हेगारांवर अटकसुद्धा झाली, त्यांनी पोलिस ठाण्याचा वापर करून स्वतःची छबी तयार करणे हे चिंता करायला लावणारी बाब आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!