‘बाळा तुला चॉकलेट घेऊन आलोय मी…” मुलाच्या अंत्यविधीत गणेश कोमकर ढसाढसा रडला; “माझ्या मुलाची काय चूक होती?”


पुणे : वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर हा जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. असं असताना आंदेकर गटाने गणेश कोमकरच्या मुलाला टार्गेट केलं. आंदेकर टोळीने ५ सप्टेंबरला रात्री आठ वाजता क्लासमधून घरी आलेल्या आयुष कोमकरची हत्या केली.

आयुषच्या पार्थिवावर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याचा पिता गणेश कोमकर आला होता. यावेळी गणेशने आपल्या मुलाचा मृतदेह पाहून प्रचंड आक्रोश केला.

आयुष कोमकरचे पार्थिव काल वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आलं. यावेळी स्मशानभूमीत आयुषचे भावंड, कुटुंबातील इतर सदस्य आणि नातेवाईक आले होते. आयुष्यच्या भावाने यावेळी प्रचंड आक्रोश केला. आयुषचा पिता गणेश येणार असल्याने अंत्यविधी थांबवण्यात आले होते.

       

थोड्या वेळाने पोलीस व्हॅनमधून गणेश कोमकर आला. यावेळी स्मशानभूमी परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. कोणताही घातपात घडू नये यासाठी सर्वोतोपरी काळजी घेण्यात आली.

गणेश कोमकर स्मशानभूमीत आल्यानंतर त्याने टाहो फोडला. त्याने आपल्या मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर प्रचंड आक्रोश केला. आपल्या मुलाची काय चूक होती? असा सवाल तो रडताना करत होता. यावेळी त्याने आपल्या मुलाने दिलेली खास गिफ्ट आणलेली होती. आपण जेलमध्ये असताना आयुषने आय लव्ह यू पप्पा लिहिलेलं भेटकार्ड पाठवलेलं होतं.

या भेटकार्डमध्ये आयुष आणि त्याच्या वडिलांची लहानपणापासूनची फोटो होती. हे भेटकार्ड पाहून गणेश धायमोकलून रडत होता. त्याचा आक्रोश पाहून इतर नातेवाईकदेखील रडत होते. यावेळी वातावरण अत्यंत शोकाकूल झालेलं होतं.

बाळ तुला चॉकलेट घेऊन आलोय मी, असं म्हणत गणेशने हंबरडा फोडला. माझी काही चूक नसताना माझ्या मुलाला का मारलं? मला पण गोळ्या घाला, असं गणेश कोमकर रडत-रडत बोलत होता. “माझी चूक नसताना माझ्या मुलाला हे का भोगावं लागलं?, असंही गणेश कोमकर रडताना पोलिसांना विचारत होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!