क्रूरतेचा कळस! बाळंतपणानंतर खर्च वाढला म्हणून पती संतापला; पत्नीसोबत केलं भयंकर कृत्य, घटनेने खळबळ..


भिवंडी : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुलगा झाल्यानंतर होणाऱ्या अति खर्चामुळे पत्नीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हि घटना भिवंडील गोवंडी परिसरातील आहे.

सविस्तर माहिती अशी की, २०२८ ला लग्न झाल्यानंतर ओरीपी फकरुद्दीन इब्राहिम शेख (वय.३६) आणि पीडित महिला दोघंही वास्तव्यास होती. त्यानंतर लग्नाच्या काही महिन्यांतर त्यांच्याच वारंवार क्षुल्लक कारणावरुन खटके उडत होते.

तसेच २०२५ मध्ये महिलेला मुलगा झाला मात्र मुलगा झाल्यानंतर सर्व खर्च वाढला. दररोज होत असलेल्या अति खर्चामुळे पतीने पत्नीला मारहाण केली यावरच तो थांबला नाही तर त्याने तिला घरातून हाकलूनही दिले. या प्रकरणी पीडित महिलेने भिवंडीतील भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

       

दरम्यान, भिवंडीतल्या नागरिकांमध्ये या घटनेमुळे मोठा खळबळ उडाली आहे. स्थानिक समाजसेवकांनी महिलांसाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. पोलीसही याप्रकरणी महिला आणि बाल कल्याण समितीशी संपर्क साधून पीडितेला संरक्षण देण्याची तयारी करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!