बायकोनं नोरा फतेही सारखं दिसावं म्हणून ३ तास जिम करायला लावायचा नवरा! पतीचा तो त्रास, पत्नीने थेट…,नेमकं प्रकरण काय?

मुंबई : नोरा फतेही हिच्यासारखे दिसण्यासाठी पती पत्नीवर दबाव टाकत. फक्त दबावच नाही तर दिवसातून तीन तास व्यायाम आणि पूर्ण डाएट करायला लावत. तीन तास व्यायाम केला नाही तर थेट पत्नीचे जेवण बंद केले जायचे. काही महिने या त्रासाला कंटाळल्यानंतर पत्नीने थेट पोलिस स्टेशन गाठले आणि आपल्यासोबत काय काय घडायचे याचा थेट पाडा वाचून दाखवला.

ही घटना गाझियाबादची आहे. महिलेने सांगितले की, तिचा पती सरकारी शाळेत शारीरिक शिक्षण आहे. तो कायमच तिला तिच्या दिसण्यावरून आणि वजनावरून तो टोमणे मारत. पतीचे म्हणणे होते की, तिच्यासोबत लग्न केल्याने त्याचे संपूर्ण आयुष्य खराब झाले आहे.

या तक्रारीत पीडित पत्नीने पोलिसांना सांगितले की, तिच्या नवऱ्याची इच्छा आहे की तिने बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीसारखं दिसावं. यासाठी तो पत्नीवर रोज ३ तास व्यायाम करण्यासाठी दबाव टाकत होता. नवऱ्याच्या या हट्टामुळे वैतागलेल्या पत्नीने पोलिसांना याची माहिती दिली.

पीडित महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, तिची उंची आणि रंग सामान्य असूनही तिच्या शारीरिक बांधणीवरून तिला सतत टोमणे मारले जातात. महिलेने आरोप केला आहे की, तिच्या नवऱ्याला इतर मुलींमध्ये खूप रस आहे आणि तो सोशल मीडियावर मुलींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ पाहतो.
तिनं केलेल्या तक्रारीनुसार, महिलेचा नवरा आणि सासरचे लोक तिला रोज 3 तास व्यायाम करायला लावतात. जर ती एखाद्या दिवशी 3 तास व्यायाम करू शकली नाही, तर तिला जेवण दिले जात नाही.
तिचा नवरा आणि सासरच्या लोकांची इच्छा आहे की तिचे शरीर नोरा फतेहीसारखे व्हावे. पोलिसांनी या प्रकरणात महिलेचा नवरा, सासू, सासरा आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पीडित महिलेने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत तिचा पती आणि सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत.
महिलेने गाझियाबादच्या महिला पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, ६ मार्च २०२५ रोजी तिचे लग्न मेरठ येथील एका तरुणाशी झाले होते. हे एक ठरवून केलेले लग्न होते. लग्नात मुलीच्या बाजूने १६ लाख रुपयांचे दागिने, २४ लाखांची महिंद्रा स्कॉर्पियो आणि १० लाख रुपये रोख स्वरूपात सासरच्या मंडळींना दिले होते. महिलेच्या तक्रारीनुसार, लग्नात जवळपास ७६ लाख रुपये खर्च झाले होते.
