Pune Crime : चारित्र्याच्या संशयामुळे सैतान झाला पती, शिलाई मशीनंच्या कात्रीनं बायकोचा चिरला गळा, घटनेने सगळे सुन्न….

पुणे : एका व्यक्तीने कात्रीने वार करत आपल्या पत्नीचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील खराडी परिसरात अमानुषतेचा कळस गाठणारी संतापजनक घटना घडली आहे.

दरम्यान, हत्या केल्यानंतर आरोपीनं तिचा व्हिडीओ देखील काढला आहे. जवळपास साडेतीन मिनिटांचा व्हिडीओ काढत त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
शिवदास तुकाराम गीते आरोपी पतीचं नाव आहे. तर ज्योती शिवदास गिते असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी शिवदास गिते हा मुळचा बीडचा रहिवासी असून तो पुण्यातील जिल्हा सत्र न्यायालयात टंकलेखक आहे. मागील काही दिवसांपासून त्याचा पत्नीसोबत कौटुंबीक वाद सुरू होता. तो सातत्याने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत होता. यातून त्याने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा आरोपीनं पत्नीचा जीव घेतला, तेव्हा गिते दाम्पत्याचा तीन ते चार वर्षांचा मुलगा तिथेच खुर्चीवर बसला होता. सैतान झालेल्या पतीने मुलाच्या डोळ्यादेखत पत्नीचा शिलाई मशीनच्या कात्रीने गळा चिरून हत्या केली आहे
धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा आरोपीनं पत्नीचा जीव घेतला, तेव्हा गिते दाम्पत्याचा तीन ते चार वर्षांचा मुलगा तिथेच खुर्चीवर बसला होता. सैतान झालेल्या पतीने मुलाच्या डोळ्यादेखत पत्नीचा शिलाई मशीनच्या कात्रीने गळा चिरून हत्या केली आहे.
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीनं जवळपास साडेतीन मिनिटांचा व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओत त्याने आपल्या पत्नीला मारायचं नव्हतं. पण नाईलास्तव मारावं लागलं, असे म्हंटले आहे.