पती अटकेत, रोहिणी खडसेंची शरद पवारांच्या भेटीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या….


पुणे : पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल केवलकर यांना अटक करण्यात आली आहे.खेवलकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. जामिनासाठी अर्ज करण्याची दाट शक्यता आहे. त्यापूर्वीच रोहिणी खडसे यांनी पुण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्या म्हणाल्या, प्रांजल खेवलकर यांच्या संदर्भात मी भेट घेतली नाही. पक्ष संघटना आणि संघटनेतील नियुक्ती संदर्भात ही भेट होती असं त्यांनी स्पष्ट केल आहे.

शरद पवारांच्या भेटीनंतर रोहिणी खडसे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. त्यां म्हणाल्या,या सर्व प्रकरणात मी योग्यवेळी उत्तर देणार आहे. पक्ष संघटनेबाबत ही भेट होती. खराडी प्रकरणाबाबत साहेबांना सगळी माहिती आहे.मी माझ्या पतीला भेटण्यासाठी सीपी कार्यालयात गेले होते आणि एक वकील म्हणून भेटायला गेले होते. मला कोर्टात दुसऱ्या दिवशी हजर व्हायचे होते आणि मला त्यांच्याकडून काही माहिती हवी असल्याने मी गेले होते. त्यावेळीच कार्यालयात सीपी साहेब असल्याने मी त्यांची देखील भेट घेतली. असं खडसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पती प्रांजल खेवलकरला अटक झाल्यानंतर तब्बल 24 तास रोहिणी खडसे यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया ही दिली नव्हती. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सत्य लवकरच बाहेर येईल, असे म्हणत पतीच्या फोटोसह पोस्ट शेअर केली. आता प्रांजल खेवलकरला जामीन कधी मिळतो, हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!