रेव्ह पार्टी प्रकरणी नवऱ्याला अटक, ३० तासानंतर रोहणी खडसेंनी सोडलं मौन, म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीला..


पुणे : पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथून रविवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांच्या या कारवाईनंतर राज्यात एकच खळबळ उडाली. रोहिणी खडसे यांनी पतीच्या अटकेनंतर मौन सोडलं असून पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रोहिणी खडसे यांनी पोलीस कारवाईच्या जवळपास ३० तासानंतर आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

रोहिणी यांनी पतीसोबतचा फोटो ट्वीट केला आहे. कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल, असे रोहिणी यांनी म्हटले.

रविवारी पहाटेच्या सुमारास पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत रेव्ह पार्टी सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी रात्री उशिरा छापेमारी केली. यावेळी तिथे रेव्ह पार्टी सुरू असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, मद्य आणि हुक्काचं सेवन केल्याचं पोलीस छापेमारीत समोर आलं. उस पार्टीच्या नावाखाली ही रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये ३ महिलांसह ७ जणांचा समावेश होता. आरोपींमध्ये रोहिणी खडसे यांचे पती आणि एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर हे देखील असल्याने राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!