नवरा- बायकोचा टोकाचा वाद, जेवत नाही म्हणून बापाने 6 वर्षाच्या मुलाला…!! घटनेने सगळेच हादरले…

मुंबई : जेवत नाही म्हणून सहा वर्षांच्या मुलाला पित्याने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक अंधेरीच्या सहार गावामध्ये समोर आली आहे. वायर आणि कुत्र्याला बांधण्याच्या पट्ट्याने मारहाण केल्याने मुलाच्या अंगावर वळ उठले आहेत.
या प्रकरणी पित्याविरुद्ध सहार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज कथुरे हा पत्नी आणि मुलासह सहार गाव येथे राहतो. पत्नी निशी आणि युवराज यांच्यात किरकोळ कारणांवरून वरचेवर वाद घडत होते.
काही दिवसांपूर्वी युवराजने किरकोळ कारणावरून वाद उकरून काढला , मारहाण केली आणि निशीला घराबाहेर काढले. ती माहेरी जाऊन राहत होती . २५ नोव्हेंबरला युवराजने तिला व्हिडीओ कॉल करून सहा वर्षांच्या मुलाच्या शरीरावरील जखमा दाखवल्या.

त्या पाहून निशी तातडीने सहारगाव येथील त्यांच्या घरी आली. मात्र घराला कुलूप आढळल्याने तिने शोधाशोध सुरू केली. तिचा मुलगा परिसरातील एका महिलेसोबत आढळला.

मुलाच्या अंगावर मारहाणीचे अनेक वळ तिला दिसले. याबाबत मुलाकडे विचारणा केली असता, जेवत नाही म्हणून वडिलांनी आधी वायरने आणि नंतर कुत्र्याला बांधण्याच्या पट्ट्याने मारल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर वडील शेजारी सोडून निघून गेल्याचे मुलाने सांगितले.
लहानग्याला केलेली अमानुष मारहाण पाहून निशीने थेट सहार पोलिस ठाणे गाठले आणि पतीविरुद्ध तक्रार केली . पोलिसांनी या तक्रारीवरून अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ तसेच भारतीय न्याय संहितेच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.
