कारागृहात महाघोटाळा!! दिवाळी फराळ म्हणून कैद्यांना अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकर यांनी १२०० रूपये किलोची काजूकतली खायला घातली, ती कैद्यांनी खाल्लीच नाही..


कोल्हापूर : राज्यातील कारागृहात कैद्यांच्या नावाखाली बड्या अधिकाऱ्यांनी रेशन व कॅन्टीन साहित्य खरेदीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्ट्राचार केला आहे. अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. यामुळे याबाबत आता राज्यात चर्चा सुरू झाली आहे.

कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी कैद्यांना दिवाळीमध्ये जे फराळाचे साहित्य दिले त्या फराळाच्या साहित्याचे दर हल्दीराम, काका हलवाई व चितळे बंधू यांच्या दर पत्रकाप्रमाणे होते. प्रत्यक्षात कैद्यांना लोकल मार्केटमधील फराळ खरेदी करून देण्यात आला या दरामध्ये जवळपास ४० ते ६० टक्के तफावत होती.

गत दिवाळीत राज्यामध्ये जवळपास ५ कोटी रूपयाची खरेदी करण्यात आली आहे. सदरची खरेदी करण्यासाठी कोणतीही निवीदा प्रक्रिया करण्यात आली नाही. सोबत फराळाचे साहित्य व त्याचे दरपत्रक टाकले आहे यावरून कारागृहात किती अनागोंदी कारभार चाललेला आहे हे लक्षात येईल, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

याबाबत त्यांनी अनेक दिवसांपासून आवाज उठवला आहे. ते म्हणाले, कारागृह विभागातील अधिकारी व ठेकेदार यांनी मिळून संगनमताने प्रचंड मोठा आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे. याआधीही मी शासनाकडे व प्रसार माध्यमांना पुराव्यासह कागदपत्रे सादर केलेली आहेत. शासनाकडून आज अखेर याबाबत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.

राज्यातील कारागृहात पुरविण्यात येणारे रेशन, कॅन्टीण तसेच विद्युत उपकरणासह इतर साहित्य खरेदीमध्ये करण्यात आलेला घोटाळा म्हणजे गृह खात्यानेच गृह खात्यावर दरोडा टाकल्यासारखा प्रकार आहे. राज्यातील कारागृह विभागात सेंट्रलाईज पध्दतीने रेशन , कॅंन्टीन विद्युत उपकरणे व इतर साहित्य खरेदी करण्यात आली. निवीदा प्रक्रियेत NCCF व केंद्रीय ग्राहक भांडार यांनी दिलेल्या साहित्याच्या दरपत्रकाची चौकशी केली असता मोठा गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

सध्या कारागृह विभागातील व आदिवासी विभागातील दरपत्रक माहितीसाठी टाकत आहे. आदिवासी विभागाने गहू ३७ रूपये किलोने खरेदी केला आहे तर कारागृह विभागाने ४७ रूपये किलोने गहू खरेदी करत आहेत, तूर डाळ आदिवासी विभागाने १५२ रूपये प्रति किलो तर कारागृह विभागाने २१५ रूपये किलो खरेदी करत आहे. बाजारात असणारे दर व कारागृह विभागात खरेदी होत असेलेले दरपत्रक सोबत जोडले आहे. सदरचे दरपत्रक हे गुणवत्तापुर्ण मालाचे असून कारागृहात मात्र निकृष्ठ दर्जाचे साहित्य पुरवठा केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!