सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ! चांदीही चकाकली, अमेरिका-ईरान युद्धाचा परिणाम, जाणून घ्या आजचे दर…

पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.

त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. अशातच आता इराणआणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चितता निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर दिसून येत आहे.
भारतातही आज, 2 मार्च 2026 रोजी सकाळपासून मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध केवळ त्या दोन देशांपुरते मर्यादित राहिलेले नसून त्याचा प्रभाव संपूर्ण जगावर होत आहे.

दरम्यान, या संघर्षामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. फेब्रुवारी महिना नुकताच संपला असून या संपूर्ण महिन्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली होती. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये सोन्याचा भाव तब्बल 5.056 टक्क्यांनी वाढला होता. आता युद्धाची तीव्रता वाढल्याने मार्चच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा झेप घेतली आहे.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये सुमारे 2 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. आज, सोमवार 2 मार्च 2026 रोजी, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस 5,384.52 डॉलर्स या नव्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. युद्धाची परिस्थिती कायम राहिल्यास येत्या काळात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणाम थेट भारतीय सराफा बाजारातही जाणवत आहे. गेल्या आठवड्यात मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर चांदीच्या किमती 22,054 रुपये म्हणजेच 8.72 टक्क्यांनी वाढल्या, तर सोन्याच्या किमतींमध्ये 5,228 रुपयांची म्हणजे 3.33 टक्क्यांची वाढ झाली होती. दिल्ली आणि मुंबई यांसारख्या प्रमुख शहरांमध्येही आज सकाळपासून सोन्या-चांदीचे दर वाढताना दिसत आहेत.