पवार कुटूंबियांना धक्का देणाऱ्या श्रीरंग बारणे यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद ! भाजपची आणखी एक खेळी…!
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. यामुळे मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार याकडे लक्ष लागले असताना लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले त्यांचे नाव देखील आघाडीवर होते.
आता केंद्रीय मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. त्यात शिंदे गटाला मंत्रीपदं दिली जाणार आहेत. त्यासाठी पिंपरी-चिंचवडचे प्रतिनिधीत्व करणारे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे नाव घेतले जात आहे.
यामुळे आता जगताप यांचे स्वप्न बारणे पूर्ण करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत मंत्रीपदाने पिंपरी-चिंचवडला नेहमीच हुलकावणी दिली आहे. आता थेट केंद्रात संधी चालून आली आहे.
पवार कुटुंबाला धक्का देऊन पिंपरी-चिंचवड, पुण्याची महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी याच गटाचे बारणे यांनाही हे मंत्रीपद मिळेल, अशी चर्चा आहे. यामुळे आता कोणाची वर्णी लागणार हे येणाऱ्या काळात समजणार आहे.