हॉलिवूडमध्ये लेखकांचा संप, 9 हजार लेखकांनी घेतला मोठा निर्णय

वॉशिंग्टन: हॉलिवूडमधील टीव्ही आणि सिनेमांच्या लेखकांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या लेखकांनी मंगळवारी संप पुकारला आहे. यामुळे याचे पडसाद उमटणार आहेत.

वेतनाच्या बाबतीत अनेक अनेक मोठ्या स्टुडिओशी बोलणी होऊ न शकल्याने त्यांनी हा निर्णय हॉलिवूडमधील लेखकांकडून घेण्यात आला आहे. गेल्या १५ वर्षांत प्रथमच रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिकाचे ९,००० लेखक संपावर आहेत. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
गिल्डने ट्विटरवर याची पुष्टी केली आहे. संपामुळे रात्री उशिरा होणा-या अनेक कार्यक्रमांवर परिणाम होणार आहे, याशिवाय अनेक चित्रपटांवरही या संपाचे परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे हा संप कधी मिटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी लेखक अलायन्स मोशन पिक्चर आणि टेलिव्हिजन यांच्याशी भांडत आहेत, जे डिस्रे आणि नेटफ्लिक्स सारख्या मोठ्या स्टुडिओचे प्रतिनिधित्व करतात. मंगळवारी दुपारपासून आंदोलन सुरू झाले आहे.