वारसाहक्काने मिळालेल्या जमिनीचा ताबा कसा मिळवायचा? नियम काय आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती..


पुणे : आपल्याकडे जमिनीचा वारसा पिढ्यानपिढ्या चालत आलेला असतो. शेती हा आपला पारंपरिक व्यवसाय आहे. यामुळे अनेकजण या व्यवसायाशी जोडले गेले आहेत. आपल्याला वडील, आजोबा किंवा इतर पूर्वजांकडून मिळालेल्या जमिनीवर वारसांचा नैसर्गिक हक्क असतो. मात्र, हा हक्क प्रत्यक्षात आणून जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

अनेकदा याबाबत माहिती नसल्याने वाढ होतो. यामुळे वारसाहक्काने मिळालेल्या जमिनीचा ताबा नेमका कसा घेयचा याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला जमीन ज्या व्यक्तीकडून मिळाली आहे, त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याशिवाय, वारसदार असल्याचा पुरावा म्हणून वारस प्रमाणपत्र किंवा उत्तराधिकार प्रमाणपत्र आवश्यक ठरतो.

कधी कधी जमिनीवर इतर वारस, शेजारी किंवा तिसरे पक्ष दावा करतात. अशावेळी जमीन ताब्यात घेण्याऐवजी स्थानीय सिव्हिल कोर्टात दावा दाखल करावा लागतो. कोर्ट सर्व पुरावे तपासून निर्णय देते. आपल्याला मृत व्यक्तीच्या नावाने असलेली जमीन वारसाच्या नावावर करण्यासाठी ‘सातबारा उताऱ्यावर’ वारस नोंद करावी लागते.

यासाठी तहसील कार्यालयात अर्ज करावा लागतो. त्यासोबत मृत्यू प्रमाणपत्र, नातेवाईक दाखला वडिलोपार्जित असल्याचा पुरावा आणि तुमचा ओळखपत्र जोडावे लागतात. अर्ज केल्यानंतर संबंधित तलाठी किंवा मंडळ अधिकारी तुमच्या कागदपत्रांची तपासणी करतो. कागदपत्रे खरी असल्याचे सिद्ध झाल्यास, त्या जमिनीवर तुमचे नाव नोंदवले जाते. ही नोंद ग्रामपंचायत किंवा महसूल नोंदवहीत केली जाते.

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, नवीन सातबारा उताऱ्यावर तुमचे नाव “वारस” म्हणून नोंदवले जाते. यालाच ‘वारस नोंदीचा ताबा’ म्हणतात. यानंतर तुम्ही त्या जमिनीचे कायदेशीर मालक म्हणून ओळखले जाता. नाव नोंदविल्यानंतर, प्रत्यक्ष ताबा मिळवण्यासाठी कोणतीही अडचण नसेल, तर तुम्ही ती जमीन कसू शकता विकू शकता किंवा भाड्यानेही देऊ शकता.

अडचण असल्यास स्थानीय महसूल विभागाकडून पंचनामा करून ताबा मिळवण्याचा अधिकार तुम्हाला आहे, अशी प्रक्रिया तुम्हाला करावी लागणार आहे. यामुळे ही साधी आणि सोप्पी प्रक्रिया आहे. यामध्ये तुम्हाला माहिती असल्यास इतर जास्त गोष्टी कराव्या लागणार नाहीत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!