गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेते? अखेर माहिती आली समोर…

पुणे : प्रसिद्धीच्या झोतात आलेली डान्सर गौतमी पाटील सतत चर्चेत असते. असे असताना ती किती मानधन घेते याची माहिती समोर आली आहे. गौतमी एका शो साठी दीड ते दोन लाख रूपये घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
गौतमी पाटील आणि तिची लावणी सध्या चर्चेचा विषय ठरतोय. राज्यात अनेक ठिकणी गौतमी पाटीलच्या लावणीचे कार्यक्रम होत आहेत. सध्या चर्चेत असलेली ही गौतमी तिच्या एका कार्यक्रमसाठी किती मानधन घेते हा प्रश्न अनेकांना पडला होता.
यामुळे गौतमीने पैसे कमावण्यासाठी ऑर्केस्ट्रामध्ये काम सुरू केले. महेंद्र बनसुळे सर यांच्याकडे ती कामाला होती. नंतर, अकलूज लावणी महोत्सवात गौतमीने बॅक डान्सर म्हणून काम केले तेव्हा तिला ५०० रुपये मानधन मिळाले होते.
गौतमीच्या जन्मापूर्वीच तिचे आई वडील वेगळे झाले होते. तिच्या वडिलांनी काही कारणांमुळे तिच्या आईला नववा महिना सुरू असतानाच सोडून दिले. गौतमीच्या जन्मानंतर तिच्या आईने जॉब केला. गौतमी हालाखीच्या परिस्थितीतून पुढे आली आहे.