31 डिसेंबरला पार्टी करताना दारू किती मिळणार? 4 पेग पेक्षा अधिक दारू मिळणार नाही, वाचा संपूर्ण नियमावली…


पुणे : येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सेलिब्रेशन करताना लोकांना संपूर्ण रात्र पार्टी करण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आली आहे. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. मात्र याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 31 डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

असे असताना मात्र 31 डिसेंबरच्या फुल नाईट पार्टीदरम्यान कोणत्याही प्रकारचा चुकीचा प्रकार होऊ नये, यासाठी हॉटेल असोसिएशनने आराखडा तयार केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये ग्राहकांना चार मोठे पेग दिल्यानंतर दारु न पिण्याचं आवाहन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी मापात कराव्या लागणार आहेत.

जेणेकरून ग्राहकांनी पार्टीदरम्यान दारूच्या नशेत असताना किंवा पार्टीवरून घरी परतताना कोणतीही चूक करू नये. यादिवशी अनेक लोक दारू पिऊन सेलिब्रेशन करतात, मात्र आता हॉटेलमध्ये त्यांना 4 पेक्षा जास्त पेग मिळणार नाहीत. यामुळे अनर्थ टळणार आहेत. तसेच इतर देखील नियम लावले आहेत.

यामध्ये ग्राहकांना दारू देताना त्यांच्या वयाची पडताळणी करण्यासाठी ओळखपत्र तपासण्याची आणि मद्यपान केलेल्या लोकांसाठी भाड्याने ड्रायव्हर देण्याची योजना आखली आहे. यामध्ये अपघात होऊ नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, नववर्षाच्या पार्टीचे वेध लागताच त्या दृष्टीने अनेकांचे प्लानिंगही होते. काहींचा घरातच कुटुंबिय किवा मित्र-मैत्रिणींसह सेलिब्रेशनचा प्लान असतो तर काही जण हॉटेल रिसॉर्टमध्ये जाऊन न्यू इअरचे सेलिब्रेशन करण्याचे ठरवतात. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रयत्न करत असतात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!