ऑगस्ट महिन्यात किती दिवस बँका राहणार बंद? वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी..

पुणे : कॅलेंडर हातात आल्यानंतर सर्वात पहिले आपण काही काम करत असू तर ते म्हणजे कोणत्या महिन्यात किती दिवस बँक हॉलिड़े आहेत ते बघतो. खरं आहे ना? तर सर्वांसाठी ऑगस्ट महिन्यात अधिक चांगली बातमी आहे. कारण पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये अनेक दिवस बँका बंद राहतील.

ऑगस्ट २०२५ मध्ये, देशभरातील विविध राज्यांमध्ये सण आहेत. तसेच साप्ताहिक सुट्ट्यांसह एकूण १५ दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि गणेश चतुर्थी यांचा समावेश आहे. आरबीआयच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, सुट्ट्या झोननिहाय निश्चित केल्या जातात, त्यामुळे महत्त्वाचे बँकिंग काम आधीच पूर्ण करणे उचित आहे.
या तारखेला बँका बंद राहणार..
३ ऑगस्ट : केर पूजामुळे त्रिपुरामध्ये या दिवशी बँका बंद राहतील
८ ऑगस्ट : तेंडोंग लो रम फाट सणामुळे सिक्कीम आणि ओडिशामध्ये या दिवशी बँका बंद राहतील
९ ऑगस्ट : या दिवशी देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाईल. ज्यामुळे मध्य भारतात जवळजवळ सर्व खाजगी आणि सरकारी बँका बंद राहतील. यामध्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान इत्यादींचा समावेश आहे
१३ ऑगस्ट : मणिपूरमध्ये देशभक्ती दिनामुळे या दिवशी बँका बंद राहणार आहेत
१५ ऑगस्ट : या दिवशी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात राष्ट्रीय सुट्टी आहे. त्यामुळे सर्व खाजगी आणि सरकारी बँका बंद राहतील
१६ ऑगस्ट : या दिवशी जन्माष्टमीमुळे देशातील जवळजवळ सर्व राज्यांच्या खाजगी आणि सरकारी बँका बंद राहतील
१६ ऑगस्ट : पारसी नववर्षामुळे गुजरात आणि महाराष्ट्रातील सर्व बँका बंद राहतील
२६ ऑगस्ट : या दिवशी गणेश चतुर्थीमुळे कर्नाटक आणि केरळमध्ये बँका बंद राहतील
२७ ऑगस्ट : या दिवशी गणेश चतुर्थीमुळे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, पंजाब, ओडिशा, सिक्कीम, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये बँका बंद राहतील
२८ ऑगस्ट : या दिवशी नवखाईमुळे ओडिशा, पंजाब आणि सिक्कीममध्ये बँका बंद राहतील
