गणेशोत्सवासाठी शाळेंना 5, 7 की 9 नेमक्या किती दिवस सुट्ट्या?, महत्वाची माहिती आली समोर..


मुंबई : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेवला असून महाराष्ट्रात तो मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. गणेशोत्सव हा 11 दिवस असतो आणि याचा आनंद पूरेपूर घेता यावा म्हणून शाळांना सुट्टी देण्यात येते.

मुंबई, पुण्यात आणि इतर शहरांमध्ये कामानिमित्त राहणारे कोकणवासीय गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जातात. त्यामुळे याकाळात विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी देण्यात येते. यंदा गणपतीमध्ये शाळांना नेमकी किती दिवस सुट्ट्या आहे याबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट 2025 रोजी येत आहे तर विसर्जन 6 सप्टेंबरला होणार आहे. याच दरम्यान गौराईचे आगमन व पूजा, तसेच 5 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद असल्याने शाळांच्या कॅलेंडरमध्ये सुट्ट्यांची गणिते बदलली आहेत.

मुंबई, पुणे आणि कोकणपट्टीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. नोकरी-व्यवसायासाठी शहरात राहणारे कोकणवासीय आपल्या गावी जाण्याने शाळांना परंपरेने या काळात अधिक सुट्ट्या दिल्या जातात. त्यामुळे यंदाच्या सुट्ट्यांचे नियोजन आधीच करून प्रवास, पूजा आणि कौटुंबिक कार्यक्रमांची आखणी करणे सोयीचे ठरणार आहे.

तसेच मुंबई आणि कोकणातील सरकारी शाळांना परंपरेने 5 दिवसांच्या सुट्ट्या असत, मात्र यंदा गौराई कार्यक्रम 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत आल्याने विद्यार्थ्यांना एकूण 7 दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. 27 ऑगस्टला गणेश चतुर्थीपासून सुरू होणाऱ्या या सुट्ट्या गौराई विसर्जनापर्यंत चालणार असून कुटुंबासोबत उत्सव साजरा करण्यास अधिक वेळ मिळणार आहे.

दुसरीकडे, मुंबईतल्या काही सीबीएसई व आयसीएसई बोर्ड शाळांमध्ये नेहमीप्रमाणे 5 दिवसांच्या सुट्ट्या ठेवण्यात आल्या आहेत. अशा शाळांमध्ये मुख्य उत्सवाच्या दिवसांना प्राधान्य देऊन शैक्षणिक कामकाज शक्य तितके सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दरम्यान, काही वेळापत्रकांनुसार 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या सात दिवसांपैकी शाळांना सलग सुट्ट्या लागू शकतात आणि त्यानंतर 5 सप्टेंबरची ईद-ए-मिलाद, 6 सप्टेंबरचे विसर्जन व 7 सप्टेंबरचा रविवार धरल्यास एकूण 9 दिवस सुट्या मिळण्याची शक्यता आहे. ज्या शाळांमध्ये मुख्यतः 5 दिवसांच्या सुट्ट्या असतात, त्या ठिकाणीही ईद-ए-मिलाद, विसर्जन आणि रविवार मिळून साधारण 8 दिवस विश्रांतीचा कालावधी विद्यार्थ्यांना मिळेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!