‘टक्कल व्हायरस’ने ग्रस्त रुग्णांची चिंता मिटली, परत येऊ लागली केसं, कसा झाला चमत्कार? जाणून घ्या..


बुलढाणा : बुलढाण्यातील केसगळती प्रकरणाणे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. बुलढाणा जिल्ह्यातील ११ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात त्यामध्ये तब्बल २०० च्या वर ग्रामस्थांना टक्कर पडलं होतं महिलेच्या डोक्यावरील सगळे केस एकाच वेळी निघून टक्कल पडत असल्याचे समोर येत होते.

त्यात लहान मुलांपासून तर वयोवृद्धपर्यंत आणि महिलांमध्ये ही केस गळती पहावयास मिळाली होती. केस गळती का होतंय? याच कारण शोधण्यासाठी दिल्ली, पाटणा, चेन्नई, मुंबई येथून डॉक्टर पथक दाखल झाल होतं. विविध प्रकारच्या तपासण्या यावेळी टक्कर पडलेल्या रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या.

अशातच आता पिडीत ग्रामस्थांना पुन्हा केसं येऊ लागली आहेत. ग्रामस्थ टक्कर व्हायरसने चिंताग्रस्त असताना आयुष्य होमिओपॅथी आणि युनानीच पथक टक्कर पडलेल्या रुग्णाच्या गावात तळ ठोकून होते.

आयुष्य होमिओपॅथी आणि युनानीच्या पथकाने दिलेल्या औषधाने केस गळतीमुळे गेलेली केस आता परत येऊ लागल्याचं सांगत केस गळतीच्या रुग्णांमध्ये आता घट झाली असल्याची माहिती आरोग्य केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.

बुलढाण्यातली शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावांतील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण झाली होती. सुरुवातीला या आजाराची लागण झाल्यानंतर डोके खाजवणं, नंतर सरळ केस हाती येणं आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. धक्कादायक बाब म्हणजे दिल्लीवरून डॉक्टरांचे पथक येऊनही यामागचे नेमके कारण समजू शकलं नव्हते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!