लोणी स्टेशन येथील हॉटेल महालक्ष्मीवर छापा, मोठा दारूचा साठा केला जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई..


लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी स्टेशन (कदमवाकवस्ती, ता.हवेली) येथील महालक्ष्मी हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकल्याची माहिती आहे. आज बुधवारी (ता.२६) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास छापा टाकला आहे.

या छाप्यात विभागाने मोठा दारूचा साठा जप्त केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. महालक्ष्मी हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा छापा टाकल्याची माहिती आहे. या छप्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं घडलं काय?
हॉटेल महालक्ष्मी मधून बेकायदा देशी विदेशी दारूची विक्री केली जात आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला आहे.

दरम्यान, घटनास्थळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल आहे. तसेच याठिकाणी कारवाई करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!