हॉटेल जगदंबा गॅस स्फ़ोट प्रकरण ; मृतांची संख्या 5 वर, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गोरगरिबांचा जीव टांगणीला, जबाबदार कोण?

पुणे : दौंड तालुक्यातील पाटस रोडवर असलेल्या गिरीम हद्दीतील हॉटेल जगदंबामध्ये 7 जानेवारी रोजी झालेल्या स्फोटाने खळबळ उडाली होती.या दुर्घटनेतील मृतांची संख्या 5च्या वर पोचली आहे.यामध्ये एका अल्पवयीन बालकामगाराचा ही समावेश आहे.प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या घटनेची सखोल चौकशी होण्याची मागणी आता ग्रामस्तरातून होत आहे

समोर आलेल्या माहितीनुसार, हॉटेल जगदंबा मध्ये झालेल्या गॅसच्या स्फोटामध्ये एकूण बारा कामगार भाजले होते.त्या बारा कामगारांपैकी पाच कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून गंभीररित्या भाजलेल्या सहा कामगारांना ससून येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अत्यवस्त असून ते 75 ते 80 टक्के हुन अधिक भाजलेले आहेत. मात्र इतक्या गंभीर परिस्थितीतही ससून रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांकडून लेखी जबाबदारी घेऊन जखमींना त्यांच्या मूळ गावी हलवण्यात परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या घटनास्थळावरून तब्बल २२ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले होते. त्यापैकी बारा गॅस सिलेंडर हे अवैध घरगुती वापराचे होते. त्यामुळे हॉटेल मालक व व्यवस्थापकावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र या दुर्घटनेनंतर दौंड पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. सुरुवातीला ही घटना घडल्यानंतर काही ठिकाणी तात्पुरती कारवाई झाल्याचा दाखवला जात असल तरी आजही अनेक मोठे हॉटेलमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर सुरू आहे.

दरम्यान दहा भाजलेल्या नागरिकांना न्याय मिळणार का?असा प्रश्न आता उपस्थित होत असून या संपूर्ण प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकाकडून केली जात आहे. तसेच यावर राजकीय वर्चस्व असल्याचा संशय ही व्यक्त केला जात आहे. राजकारण व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गोरगरिबांचा जीव टांगणीला लागत आहे. याला जबाबदार कोण हा प्रश्न आता नागरिकांना सतावत आहे.
