हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे अपहरण, बेदम मारहाण करून पुलावर फेकले, भयंकर माहिती आली समोर…

धाराशिव : येथील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके (Nagesh madake) यांच्यावर सायंकाळी अपहरण आणि मारहाणीचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे ही बातमी लगेच वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली असून याबाबत तपास सुरु आहे. याठिकाणी चारचाकी गाडीतून आलेल्या पाच अज्ञात आरोपींनी त्यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केली.

नंतर वडगाव येथील पुलावर फेकून दिले. सायंकाळी नागेश मडके हे त्यांच्या हॉटेल भाग्यश्रीसमोर उभे होते, त्याचवेळी चारचाकी गाडीतून आलेल्या पाच जणांनी सेल्फी काढण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ येत गाडीत जबरदस्तीने बसवले, तसेच तेथून ते पसार झाले. त्यांना धाराशिवकडे नेले. गाडीतच या पाच जणांनी नागेश मडके यांना मारहाण केली.
अपहरणकर्त्यांनी त्यांना जीवाने मारण्याचा डाव रचला होता. मारहाणीनंतर पाचही आरोपींनी त्यांना वडगाव (सि.) येथील पुलावर फेकून दिले. गंभीर अवस्थेत असतानाही मडके यांनी त्यांच्या कुटुंबीयांना फोन करून माहिती दिली. कुटुंबीयांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. या घटनेनं सगळेच हादरले असून याबाबत तपास सुरु आहे.

गेल्या काही दिवसांपासून हॉटेल भाग्यश्री चर्चेत आहे. याठिकाणी लोकांची सतत गर्दी असते. पोलिसांकडून अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नसला तरी, लवकरच गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती मडके यांनी दिली आहे. महिन्याभरापूर्वी हॉटेल भाग्यश्रीवर काही अज्ञातांनी पोस्टर फाडून हल्ला केला होता.
तसेच गेल्या आठवड्यातही हाणामारीची घटना घडली होती. सोशल मीडियावर या हॉटेलची खूप प्रसिद्धी असून जेवणासाठी येथे मोठी गर्दी असते. मात्र असे प्रकार घडत असल्याने याठिकाणी सुरक्षारक्षक बाउन्सर तैनात करण्यात आले आहेत. यामुळे सध्या हे हॉटेल अजूनच चर्चेत आले आहे. याबाबत तपास सुरु आहे.