ठाण्यात भयानक मर्डर ; सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात खुनाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच आता कल्याणच्या शीळ रोडवर एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणीचा सुटकेसमध्ये मृतदेह आढळला आहे. आता आरोपीला शोधण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कल्याणच्या शीळ रोडवर एका सुटकेसमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला आहे. देसाई खाडी परिसरात हा मृतदेह आढळला आहे. मृतदेह सापडलेल्या तरुणीचे वय 28 ते 30 वर्षे आहे. तिची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये फरून फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला आहे. तसेच फॉरेन्सिक टिमकडून पुरावे गोळा करण्यात आले आहेत. डाकघर पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत्यू झालेली ही तरुणी नेमकी कोण आहे? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

मात्र या प्रकरणात मृत्यू झालेली तरुणी ही नेमकी कोण आहे हेच माहिती नसल्यामुळे आरोपीचा शोध तरी कसा घ्यावा? असा प्रश्न पोलिसांच्या पुढे उपस्थित झाला आहे.तसेच भविष्यात सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर काही तांत्रिक बाबींची मदत घेऊन पोलीस आरोपीला शोधण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. या प्रकरणात नेमकं काय होणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!