पुण्यात भीषण अपघात! मुलाला आणायला निघालेल्या बापाची दुचाकी ट्रकच्या चाकाखाली गेली अन….

पुणे : पुण्यातील नीरा शहरातील अहिल्यानगर-सातारा महामार्गावर मुलाला आणायला गेलेल्या दाम्पत्यासोबत आक्रीत घडल असल्याची माहिती समोर आली आहे.ट्रॅकच्या डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार व्यक्ती ट्रकच्या चाकाखाली सापडला, यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विजय कुवरलाल साखरे (रा. बोपर्डी, जिल्हा नागपूर, हल्ली वाई एम.आय.डी.सी.) असे मृत व्यक्तीचं नाव आहे. विजय साखरे हे आपल्या पत्नीसह आश्रम शाळेत सहावीत शिकणाऱ्या बारा वर्षीय मुलाला भेटण्यासाठी गेले होते. मात्र घरी परतताना ट्रकला ओव्हरटेक करताना त्यांची दुचाकी घसरली. विजय ट्रकखाली सापडले, तर लता रस्त्यावर कोसळल्या. विजय यांनी हेल्मेट घातले होते, पण अपघातात ते डोक्यातून निघाले. या अपघातात विजय यांना प्रचंड रक्तस्त्राव झाला आहे. जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले असता, गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी त्यांना लोणंद येथे हलवले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी आता नीरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षकांनी घटनास्थळी भेट देत दोन्ही वाहने ताब्यात घेतली. विजय साखरे हे वाई एम.आय.डी.सी.मध्ये दोन महिन्यांपासून कामगार म्हणून कार्यरत होते. ऐन गणेश विसर्जनादिवशी झालेल्या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
