पुण्यात भीषण अपघात; भरधाव स्कूल बसने पादचाऱ्याला चिरडलं, जागीच मृत्यू

पुणे : पुण्यातील सिंहगड रोडवर एका भरधाव स्कूल बसने पादचाऱ्याला चिरडलं असल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये ज्येष्ठ नागरिकाचा जागीच जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर बस चालक फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सिंहगड रस्त्यावर आज दुपारी १२:२० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. स्कूल बसने ज्येष्ठ नागरिकाला धडक दिला. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वृद्धाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असुन आरोपी चालक आणि संबंधित बसचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांनी सांगितले की, सिंहगड रोडवर वडगाव ब्रिजच्या दिशेने जाणाऱ्या इंद्रायणी स्कूलच्या बसने फन टाइम थिएटर समोरील रस्त्यावरून पायी जाणाऱ्या व्यक्तीला धडक दिली.त्यानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आरोपी चालकचा शोध सुरू आहे.

