कोल्हापुरात भीषण अपघात!भरधाव क्रेटा कारने 3 दुचाकींना उडवले; दोघांचा जागीच मृत्यू


कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शाहू मिल चौकात एका भरधाव क्रेटा कारने तीन दुचाकींना उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपघात इतका भीषण होता की,या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरु आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, भरधाव क्रेटा कारने दुचाकी ला दिलेल्या जोरदार धडकेत चार ते पाच जण जोरदार दूर फेकले गेले. अपघात ग्रस्त क्रेटाकार घटनास्थळीस उलटी झाली.यात तीन ते चार जण गंभीर जखमी असून तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात दोघांच मृत्यू झाला आहे.

सायबर चौकातून शाहू मिल चौकाच्या दिशेने येताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघातग्रस्त क्रेटा कार नेमकी कोणाची आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!