गुजरातमध्ये भीषण अपघात! बस दरीत कोसळून 5 भाविकांचा मृत्यू, अपघातात बसचे झाले दोन तुकडे…

गुजरातमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नाशिक-गुजरात महामार्गावरील सापुतारा घाटाजवळ रविवारी पहाटे ५ वाजता हा अपघात झाला. ही लक्झरी बस देवदर्शनासाठी प्रवाशांना घेऊन नाशिकहून गुजरातला जात होती. यावेळी हा अपघात झाला.
काही प्रवाशांना वाचवण्यात आले आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज पहाटे ४:३० वाजता महाराष्ट्रातून येणारी एक लक्झरी बस गुजरातमधील हिल स्टेशन सापुताराजवळ उलटली. ४० प्रवाशांपैकी पाच जणांना आपला जीव गमवावा लागला.
बस खड्ड्यात पडण्याची धडक इतकी जोरदार होती की बसचे दोन तुकडे झाले. घटनास्थळी बचावकार्य सुरू असताना अपघाताचे कारण अजून पुढे आले नाही. सर्व मृत आणि जखमी प्रवासी मध्य प्रदेशातील असल्याचे सांगितले जात आहे.
डांग जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळल्याने एक भीषण अपघात झाला. ज्यामध्ये आतापर्यंत ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये 40 प्रवासी प्रवास करत होती. याबाबत सध्या तपास सुरू करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले.
पोलिसांच्या माहितीनुसार, या अपघातात अनेकजण जखमीही झाले आहेत. ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याबाबत माहिती घेऊन त्यांच्या घरी संपर्क केला जात आहे. घटनेने एकच खळबळ उडाली आहे.