मध्यरात्री भीषण अपघात! बारामतीजवळ माजी मंत्र्यांच्या पुतण्याच्या फॉर्च्युनरला कंटेनरची जोरदार धडक


बारामती : गुरुवारी मध्यरात्री सोलापूर-पुणे महामार्गावर बारामतीजवळ भीषण अपघाताची घटना घडली. एका माजी मंत्र्यांचा पुतण्या आपल्या काही सहकाऱ्यांसह फॉर्च्युनर कारमधून प्रवास करत होता.

मध्यरात्री उशिराच्या सुमारास बारामतीजवळील भिगवण परिसरात त्यांच्या कारला भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हा अपघात महाराष्ट्राचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या फॉर्च्युनर कारला झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता की कारचा काही भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. मात्र सुदैवाने धनंजय सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा या अपघातातून थोडक्यात बचाव झाला असून ते सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

धनंजय सावंत हे बुधवारी मुंबईत भाजपमध्ये अधिकृत पक्षप्रवेशाचा मोठा सोहळा आटोपून आपल्या फॉर्च्युनर (MH 12 SE 5559) गाडीने परंड्याकडे येत होते. गुरुवारी (दि. १९) मध्यरात्री एकच्या सुमारास भिगवणजवळील डाळज २ गावाच्या हद्दीत आले असता, समोरून येणाऱ्या कंटेनरने (MH 12 WJ 6374) त्यांच्या वाहनाला भीषण धडक दिली.

ही धडक इतकी जबरदस्त होती की आलिशान फॉर्च्युनरच्या चालकाच्या बाजूचा संपूर्ण भाग चक्काचूर झाला. मात्र या भीषण अपघातात धनंजय सावंत यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. कारचालक आणि सुरक्षारक्षक किरकोळ जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!