भयंकर! बायको फोन लावत होती, पण उत्तर नाही! पोलिस गाडीत मृतावस्थेत, अनैतिक संबंधातून….


बुलढाणा : एका पोलिसाचा कारमध्ये संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच स्वतःच्याच स्विफ्ट डिझायर कारमध्ये चालक सीटवर गळा आवळून पोलिसाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ज्ञानेश्वर म्हस्के (वय.४२) असे मृत पोलिसाचे नाव आहे. म्हस्के जालना महामार्ग पोलिस दलात कार्यरत होते. देऊळगाव राजा पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचीही चर्चा रंगली आहे.

नेमक घडलं काय?
बुलढाणा जिल्ह्यातील गिरोली खुर्द येथील रहिवासी असलेले म्हस्के यांची कार (एमएच-२०- डीवाय-३०६३) सकाळी देऊळगाव राजा ते सिंदखेड राजा मार्गावरील आर. जे. इंटरनॅशनल स्कूलच्या समोरील वन विभागाच्या जागेत झाडाखाली उभी असलेली आढळली होती.

तसेच विशेष म्हणजे कार आतून लॉक असल्यामुळे संशय वाढला होता. सुरुवातीला ही आत्महत्या आहे का, असा संशय व्यक्त केला जात होता. परंतु काही काळाने स्पष्टता आली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच पोलीस दलात एकच खळबळ उडाली. तसेच सर्वसामान्यांमध्येही घबराट पसरली.

दरम्यान अनैतिक संबंधातून हत्येचा संशय गळ्याभोवती व्रण असल्याने प्राथमिक तपासात गळा आवळून हत्या केल्याचा संशय होता. रात्री उशिरा विष्णू म्हस्के यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचीही चर्चा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!