भयंकर!! बारामती पालखी महामार्गावर भीषण अपघात, दुचाकी स्वाराचं धड अन् शीर वेगळं, दुचाकी कारमध्ये घुसली….


बारामती : बारामतीत पाटस पालखी महामार्गावरती एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात खूपच भीषण होता. या भयंकर अपघातात एका दुचाकीस्वराचे शीर उडून दुसऱ्या बाजूला पडले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बारामती-पाटस मार्गावरील शिर्सुफळ फाट्यावर हा अपघात घडला आहे. अमित लक्ष्मण लगड ( गोपाळवाडी, ता. दौंड) आणि विशाल रामचंद्र कोकरे (वय ३४, रा. धुमाळवाडी पणदरे, ता. बारामती) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. अपघातग्रस्त गाडी क्रेनने बाहेर काढण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बारामती-पाटस मार्गावरील शिर्सुफळ येथे कार आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत कार चालक व दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले.

हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी स्वाराचं धड आणि शीर वेगळं झालं होतं, तर कार मध्ये घुसलेली दुचाकी अक्षरशा क्रेनने ओढून बाहेर काढावी लागली. घटनेनंतर याठिकाणी पोलीस दाखल झाले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!