मधुचंद्राची रात्र ठरली शेवटची रात्र! नवदाम्पत्याचा एकाचवेळी मृत्यू, कारण ऐकून देश हादरला…


नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहानंतर मधुचंद्राची रात्र एका नवदांपत्यासाठी शेवटची ठरली. त्यामुळे लग्न घरातील आनंद एका क्षणात शोकसागरात बुडाला.

मिळालेल्या माहिती नुसार, नुकतेच लग्न झालेले नवदांपत्य मधुचंद्राच्या रात्री घरात गेल्यानंतर उठलेच नाहीत. नातेवाईकांनी दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजा ठोठावूनही कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी दरवाजा तोडून जेव्हा कुटुंबीयांनी आज प्रवेश केला, तेव्हा दोघेही मृतावस्थेत आढळून आले.

कुस्तीपटूंनी आरोप केलेले ब्रिजभूषण सिंग यांची करोडोंची संपत्ती, हेलिकॉप्टर, सहा एसयूव्ही, अनेक संस्था, कॉलेज आणि

त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मात्र या घटनेने परिसरासह संपूर्ण गावाला धक्का बसला. या घटनेची मोठी चर्चा झाली.

पुण्यात नेमकं चाललंय काय? आता पत्रकारावर झाला गोळीबार, १५ दिवसांपूर्वीही झाला होता हल्ला..

मात्र जेव्हा डॉक्टरांनी या दोघांच्या मृतदेहाचं शिवविच्छेदन केले, तेव्हा त्यातून एक महत्त्वाची माहिती समोर आली, ती म्हणजे दोघांनाही एकाच वेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

दरम्यान, २० आणि २२ वर्षाच्या तरुणांना हृदयविकाराचा धक्का कसा येऊ शकतो?, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर डॉक्टरांनी कोरोनाच्या काळाशी संबंध जोडला. कोरोनाने संपूर्ण परिस्थिती बदलली असून कोरोना हा आर एन एस प्रकारचा विषाणू आहे.

ब्रेकिंग! ईडीने अटक करताच ऊर्जामंत्री ढसाढसा रडू लागले, अन्

अशा प्रकारच्या विषाणूमुळे रक्ताच्या गुठळ्या होतात किंवा ब्लॉकेज वाढतात. ज्यामुळे हृदयातील रक्तप्रवाह असामान्य होतो आणि हृदयविकाराचा झटका येतो.

अर्थात या नवदांपत्याच्या मृत्यूमागे फक्त लैंगिक क्रिया एवढेच कारण जोडता येणार नाही असे देखील डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. रात्रीचे जागरण, फास्ट फूड चा जास्त वापर, तणाव ही सुद्धा कारणे यामागे असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!