हनी सिंगने गाडीच्या नंबरसाठी खर्च केले होते चक्क ! ‘इतके’ लाख रुपये…!
नवी दिल्ली : तरुणांना आपल्या खास शैलीतील रॅपने ओळख निर्माण करणाऱ्या हनी सिंगची क्रेझ तरुणांमध्ये कायम आहे. भारतीय चित्रपसृष्टीत त्याची ओळख रॅपर म्हणूनच आहे. गेले काही बराच काळ तो प्रसिद्धी झोतात नव्हता. त्याने आपल्या रॅपने तरुणांसह सर्वांनाच थिरकायला भाग पाडते आहे.
याचदरम्यान , आज हनी सिंग आपला ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. हनी सिंगनं आपल्या गाण्याच्या हटके स्टाइल स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे चाहत्यांना देखील त्याच्या खासगी आयुष्याबद्दल माहिती जाणून घेण्यास नेहमीच उत्सुकता असते.
अनेक मुलाखतीमध्ये तो त्याच्या खासगी जीवनावर देखील भाष्य करत असतो. त्यामुळे तो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. त्याला एका मुलाखतीमध्ये गाड्यांच्या प्रेमाबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी त्याने सांगितले की, आता गाड्यांचा शौक राहिलेला नाही.
हनी सिंगने पुढे सांगितले की, ज्यावेळी त्याने ऑडी आर ८ ही गाडी खरेदी केली होती त्यावेळी त्याने त्या गाडीच्या स्पेशल नंबर प्लेटसाठी तब्बल २८ लाख रुपये खर्च केले होते. या गाडीचा नंबर आर ८ हा होता त्यामुळे माझ्यासाठी हा नंबर खास असून मी यासाठी तब्बल २८ लाख रुपये खर्च केले होते. असं तो यावेळी म्हणाला आहे.