Home Remedies : आता वाढणारे वय थांबवा, ते पण घरगुती उपायांनी, जाणून घ्या कसे..
उरुळीकांचन : वाढत्या वयाबरोबरच, धूळ, प्रदूषण, ताण-तणाव हे सर्व हळूहळू चेहऱ्यावर दिसू लागतं. असं होताच अनेक स्त्रिया खाडकन जाग्या होतात. वाढत्या वयानुसार सुंदर चेहरा आणि त्वचा, केस असणं यासाठी घरगुती प्रयत्न करता यतील. त्यासाठी वेगळी ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही. नेमके काय आहेत हे घरगुती प्रयत्न ते आपण बघुयात. Home Remedies
लिंबाची कमाल : लिंबाचा रस वाढतं वय कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय आहे. यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व खूप मोठ्या प्रमाणावर असतं. लिंबाच्या रसामुळे त्वचा चमकदार आणि फ्रेश दिसू लागेल. आणि त्वचेला उन्हाचा त्रास पण होणार नाही. जर तुम्ही चेहऱ्यावर असणाऱ्या डागांवर लिंबाचा रस लावून १५ मिनीटांनी चेहरा धुतला तर चेहरा डागविरहित होईल. उन्हाचा त्रास जर झाला असेल तर टोमॅटोच्या रसात लिंबू मिसळून ते चेहऱ्याला लावा. Home Remedies
कांदा-लसूण : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल; मात्र हे खरं आहे वाढतं वय लपवण्यासाठी कांदा आणि लसूण खूप उपयोगी आहे. कांद्याचा रस जर नियमित चेहऱ्याला लावला तर चेहऱ्याला आवश्यक असणारी तत्त्वं मिळतात. शिवाय लसणामध्ये वय थांबवण्याचे औषधी गुण आहेत.
पपई : पपईमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर असतं. पपई आहारात खायला हवी आणि ती तुम्ही चेहऱ्यावर सुद्धा लावू शकता. पपईमध्ये पापीन नावाचा एक पदार्थ असतो जो चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकतो. डाग हटवण्यासाठी पपई चेहऱ्यावर घासून त्याचा रस चेहऱ्याला लावायला हवा आणि त्यानंतर गरम पाण्याने चेहरा धुवून टाकावा.
घरगुती फेस पॅक : फेस पॅक लावण्यासाठी सतत ब्युटी पार्लरला जाण्याऐवजी तुम्ही घरच्या घरी फेस पॅक तयार करू शकता. एक कप ताक, ४ चमचे दलिया, १ चमचा बदामचं तेल एकत्र करून त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्या. हा पॅक तुम्ही चेहऱ्याला आणि मानेला लावून २० मिनिटे राहू द्या आणि मग चेहरा धुवून टाका. याशिवाय १/२ केळ ( कुस्करून), १ चमचा मध, १ चमचा कणिक घेऊन त्याची पेस्ट बनवा. नंतर कोमट पाण्याने धुवून टाका.
आता काही किचन टिप्स
■ कणीक मळताना सैल झाली असेल तर ती तोडण्यापूर्वी हाताला तेल लावावे व नंतर उंडा तोडावा. चपाती सहजतेने लाटता येईल.
■ पराठे बनवताना हिंग पाण्यात घोळवून बटाट्याच्या पिठात मिसळावा. यामुळे पराठे सहजतेने पचतील.
■ कढी तयार करताना दही व बेसन टाकण्यापूर्वी पाणी ओतावे. त्यानंतर त्यात दही व बेसन टाकावे. कढी फुटणार नाही.
■ भात तयार करताना पाणी बाहेर सांडू नये, यासाठी भातात एक चमचा तूप टाकावे. भात उतू जाऊन बाहेर सांडणार नाही.
■ चुन्याच्या पाण्यात अंडी ठेवल्यास ती जास्त दिवस ठेवता येतात.
■ टोमॅटोची चटणी तयार करताना ती शिजत असताना मीठ टाकू नये. जाळावरून उतरल्यावरच मीठ टाकावे. टोमॅटोचा रंग जसाच्या तसा राहील.