राज्यात पुन्हा होम क्वारंटाईन? वार्ड उभारण्याची तयारीही सुरू? आरोग्यमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक, म्हणाले…

मुंबई : सध्या चीनमध्ये HMPV या नव्या व्हायरसने शिरकाव केल्याने जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. यामुळे येणाऱ्या काळात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रकाश आबिटकर म्हटले की, याबाबत आपण एक बैठक बोलावली आहे. हा विषाणू यापूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. फक्त चीनमध्ये त्याची संख्या झपाट्याने वाढल्याने चीनने काळजी घेण्याचे काम केले आहे. आपल्याकडे याबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत. त्यावर आपण काम करतोय.
आपली संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. आरोग्य विभाग नागरिकांना योग्य त्या सूचना देतील. नागरिकांनी काळजी घ्यावी, घाबरण्याचे काहीही कारण नाही. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे. त्यांना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. यावर यंत्रणा सज्ज आहे.

तसेच सध्या विलगीकरण्याची आवश्यकता नाही. तर लोकांची जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन नागरिकांनी करावे. आरोग्य विभागाच्या सूचना आज किंवा उद्या जाहीर होतील, राज्यातील आरोग्य विभाग त्याच पद्धतीने कामकाज करत आहे.
राज्यात देखील याचे रुग्ण सापडले असून नागपूरमधील सात वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPV ची लागण झाल्याचे समोर आले आहे. 3 जानेवारी रोजी दोघांनाही HMPV ची लागण झाली होती. दोन्ही मुलांमध्ये खोकला आणि तापासारखी लक्षणे दिसून आली. यामुळे आता काळजी घेणे गरजेचे आहे.