वाढेलल्या गुन्हेगारीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय, थेट 13 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पोलीस प्रशासन हादरलं…

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलीस दलाबाबत मोठा निर्णय घेत पोलीस प्रशासनाला धक्का दिला आहे. तेरा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेशच गृह खात्याकडून काढण्यात आला आहे. सध्या वाढलेली गुन्हेगारी बघता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
यामध्ये राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी मनोज कुमार शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्यासह अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामुळे येणाऱ्या काळात तरी गुन्हेगारी कमी होणार का? हे लवकरच समजेल.
राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका एकीकडे सुरू असताना आता तेरा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ही करण्यात आल्या आहेत. तशा पद्धतीचा जीआर राज्याच्या गृहखात्याने काढला आहे. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला आहे. बदली झालेले अधिकारी खालीलप्रमाणे आहेत.
1. छेरिंग दोर्जे – अपर पोलिस महासंचालक, विशेष अभियान
2. के एम मल्लिकार्जुन – अपर पोलिस महासंचालक, प्रशासन
3. अभिषेक त्रिमुखे – अपर पोलिस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग
4. .श्रेणिक लोढा – अपर पोलिस अधीक्षक, खामगाव बुलढाणा
5. मनोज कुमार शर्मां- विशेष पोलिस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था
6. आर बी डहाळे – विशेष पोलिस महानिरीक्षक, गुन्हे अभिलेख केंद्र
7. अशोक मोराळे – विशेष पोलिस महानिरीक्षक, मोटार परिवहन विभाग
8. राजीव जैन – विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस बल
9. निखील गुप्ता – अपर पोलिस महसंचालक, कायदा आणि सुव्यवस्था
10. सूरेश मेखला – अपर पोलिस महसंचालक, आर्थिक गुन्हे शाखा
11. यशस्वी यादव – अपर पोलिस महासंचालक, सायबर सेल
12. सुहास वारके – अपर पोलिस महासंचालक, कारागृह आणि सुधारसेवा
13. अश्वती दोर्जे – अपर पोलिस महासंचालक, महिला आणि बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग