Home Decoration : पाहुणे येणार असल्यास अशी करा घराची सजावट…


Home Decoration उरुळीकांचन : सण, उत्सव, लग्न, वाढदिवस आप्तस्वकीयांचं घरी येणं-जाणं सुरू होतं. म्हणूनच अशा ” वेळेस आपलं घर सजलेलं, सुंदर आणि मोहक दिसायला हवं. त्यासाठी या टिप्स..

» पुस्तकांच्या कपाटांमधली पुस्तकं व्यवस्थित लावून घ्या.

»कित्येक वर्षे एखाद्या कोपऱ्याचा विचारच आपण केलेला नसतो. अशा सणांच्या वेळी या कोपऱ्याचा जरूर विचार करावा. एखादा गडद रंग त्याला लावा. आजकाल अशी एक गडद रंग लावायची खूप फॅशन आहे किंवा तुमच्या घरातील शोकेसच्या वस्तू त्यावर रचून ठेवा. नुसत्या काचा असतील तर त्यांना काचेचं दार लावून छान शोकेस करू शकता. Home Decoration

» प्रत्येक वर्षी नवीन काही ना काही करणं शक्य नसतं. त्यामुळे प्रत्येक वर्षी काही ना काही वेगळं करायचा प्रयत्न करा. एखाद्या ठिकाणी शेल्फ करून घ्या. कुठे काही ठेवण्यासाठी कॉर्नर लावून घ्या, काचेचे किंवा लाकडाचे दोन्ही प्रकारे तुम्हाला कॉर्नर्स लावून मिळतात. आता तर त्या कॉर्नरमध्येही भरपूर व्हरायटी आली आहे. आपल्या गरजेप्रमाणे हे कॉर्नर तुम्हाला लावून मिळतात.

» प्रत्येक कोपऱ्यातल्या वस्तू काढून टाकल्या की आपल्या घराला कशा प्रकारे सजवायचं आहे याचा विचार करा आणि त्याप्रमाणे बदल करा. प्रत्येक वेळी काही नवीनच करायला
हवं असं नाही. तुटलेल्या वस्तूंप्रमाणेच खराब झालेले सनमाइका बदलून घ्या. रंगाचं काम करायचं नसेल तर बदलतो. वॉलपेपरचा विचार करायला हरकत नाही. म्हणजे तुम्हाला घराचा लूक चेंज केल्याचं समाधान मिळेल.

» भिंतीवरच्या चित्रांची लायब्ररीदेखील असते. त्या लायब्ररीचा उपयोग करा. म्हणजे दर आठवड्याला चित्रं बदला. सणासुदीला शोभेल असं किंवा तुमच्या घराच्या थीमला साजेशा चित्राची निवड करा. म्हणजे बघा तुमचं घर कसं उजळून दिसतं.
» सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घर
सजवताना किंवा प्रत्येक कोपरा

सजवताना घरातल्या प्रत्येकाची आवडनिवड लक्षात घ्या.

» अगदी विशेष बदल केले नाही तरी बेडशीट आणि उशांचे अभ्रे बदलावेत. त्यांना शोभतील असे पडदे बदलल्यामुळेही घराला वेगळाच रंग चढतो.
» सामानांची जागा अदलाबदली करून बघा. कधी कधी सामानांची अदलाबदल केल्यानेही घराचा मूड बदलतो.
» दिवाळीसाठी खास घर सजवण्यासाठी बाजारातही विविध वस्तू मिळतात. त्यांचा विचार करा. त्या आणण्यापूर्वी एकदा बाजारात जाऊन काही नवीन आहे का ते बघा.

आता काही विशेष; महिलांनो ब्रेकफास्टसाठी दररोज वेळ काढा

दररोज कुठलंही कारण न देता न्याहारी करणं निरोगी शरीरासाठी खूप गरजेचं आहे. हे माहीत असूनही अनेक महिलांना सकाळी न्याहारी करायला वेळ मिळत नाही. मात्र रात्रीच काही गोष्टी जर करून ठेवल्या तर घरातल्यांसोबत स्त्रीलाही न्याहारी करायला वेळ मिळेल आणि तिचं आरोग्यही सांभाळलं जाईल. त्यासाठी या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील.

सकाळी लवकर उठा : रात्री उशीरा घरी येऊन जेवण करून झोपल्यामुळे अनेकांना सकाळी भूक लागत नाही तेव्हा न्याहारी करण्यासाठी सकाळी लवकर उठावे. सकाळी लवकर उठल्यामुळे तुम्हाला न्याहारी करायला वेळ मिळेल आणि दुपारचं जेवणही वेळेत होऊ शकेल.

प्राणायाम करा : रोजच्या धकाधकीच्या आयुष्यापासून निवांतपणा मिळवण्यासाठी थोडा वेळ ध्यान किंवा प्राणायाम करायला हरकत नाही. यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल.
न्याहारी करण्यास विसरु नका : अनेकांचा हा गैरसमज असतो की न्याहारी केली नाही तर वजन कमी होईल. मात्र असं न होता प्रत्यक्षात न्याहारी न करणाऱ्या लोकांचं वजन वाढण्याची शकता जास्त असते.

रात्रीच थोडी तयारी करून ठेवा : न्याहारी बनवण्यासाठी जर तुमच्याकडे वेळ नसेल तर न्याहारी तयार करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी थोडी तयारी करून ठेवली की तुम्हाला सकाळी उठून फारशी तयारी करण्याची गरज पडणार नाही. न्याहारी बनवताना त्यात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट आहेत ना याची काळजी घ्या.

वर्कआऊट : सकाळी उठून व्यायाम केल्यानंतर न्याहारी करणं सर्वांत चांगला पर्याय आहे. त्यामुळे तुमचा दिवस जर लवकर सुरू होत असेल तर तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी चांगलं आहे. व्यायाम करण्याच्या अगोदर हलकं काहीतरी खाण्यास हरकत नाही. मात्र सकाळी त्यानंतर न्याहारी करणं गरजेचं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!