भावा बहिणीचा सण होणार उत्साहात साजरा, रक्षाबंधनाची पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना सुट्टी जाहीर..
पुणे : रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणींसाठी सर्वात खास दिवस आहे. या दिवशी, बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांना दीर्घायुष्याची शुभेच्छा देतात आणि भाऊ त्यांच्या बहिणींना त्यांचे रक्षण करण्याचे वचन देतात.
महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात गावागावांमध्ये दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना ३० ऑगस्ट २०२३ रोजी रक्षाबंधन या सणाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
बहिण-भावाच्या अतुट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन दोन दिवसांवर हा सण आला असून बाजारपेठा सजल्या आहेत. पुणे जिल्ह्यामधील प्राथमिक शाळांच्या २०२३ या शैक्षणिक वर्षाच्या सुट्टयांची यादी जानेवारी महिन्यात जाहीर झाली आहे.
दरम्यान, या यादीमध्ये २० नोव्हेंबर २०२३ रोजी येणारी गुरुनानक जंयतीची सुट्टी ही दीपावलीच्या सुट्टीमध्ये येत आहे. यामुळे ही सुट्टी राष्ट्रीय सणांच्या यादीमधून वगळण्यात आली आहे. त्याऐवजी ही सुट्टी बुधवारी (ता. ३० ऑगस्ट) रोजी रक्षाबंधनादिवशी जाहीर करण्यात आली आहे.