पिंपरी चिंचवडकरांसाठी मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! जिल्हा, अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी…

पुणे : राज्य सरकार मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पिंपरी चिंचवडकरांसाठी राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसंच वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक ठरणाऱ्या या निर्णयाला आज मूर्त स्वरूप मिळालं आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे. मी मुख्यमंत्री महोदय यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानतो.
तसेच पिंपरी-चिंचवडसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या महापालिकेला स्वतंत्र जिल्हा व सत्र न्यायालयाची नितांत गरज होती. नागरिकांना आता पुण्याला न जाता स्थानिक न्यायालयांतूनच न्याय मिळेल, याचा आनंद आहे. असेही ते म्हणाले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून याबाबत मागणी केली जात होती. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. यामुळे आता स्वतंत्र कारभार जिल्हा सत्र न्यायालयाचा होणार आहे. यामुळे लवकर कामे मार्गी लागणार आहेत.